Elphinstone Bridge |... म्हणून मुंबईतील एलफिस्टन पूल पाडणार? Special Report
मुंबईतला सव्वाशे वर्ष जुना एलफिन्स्टन पूल पाडण्यात येणार आहे..मात्र हा पूल बंद करून त्याच्या पाडकामाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तीव्र विरोध दर्शवलाय. दोन्ही ठाकरेंच्या सेना आज रस्त्यावर उतरल्या.. पुलाच्या एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेनं तर दुसऱ्या बाजूला मनसेनं आंदोलन केलं..
रस्त्यांची काम पूर्ण झाल्यानंतरच पूल पाडावा अशी ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आहे.. तर विकासाला विरोध नाही, मात्र स्थानिकांचे आधी प्रश्न सोडवावे.. अशी मागणी करत, मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही दिलाय.
हा आहे प्रभादेवी पूल. आजही इथले रहिवासी या पुलाला एल्फिन्स्टन ब्रिज म्हणून ओळखतात. हा पूल लवकरच पाडला जाणार आहे. आणि तो पाडला जाऊ नये, यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना दोन पक्षांनी आंदोलनं सुरु केलीयत. त्यातला एक पक्ष आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरा राज ठाकरेंची मनसे. पुलाच्या दोन टोकांवरून दोन्ही पक्ष एकच मागणी करतायत.. पण श्रेयवादावरून मात्र दोन्ही पक्ष दोन टोकांवर असल्याचं चित्र आहे.
या आंदोलनाचं मूळ कारण म्हणजे एमएमआरडीएकडून बांधण्यात येणारा उन्नत रस्ता.
म्हणून पाडणार एलफिस्टन पूल! (हेडर) दक्षिण मुंबईतून अटल सेतूला अतिजलद जाता यावं, यासाठी एमएमआरडीएकडून शिवडी-वरळी उन्नत रस्ता बांधला जातोय. सध्या धोकादायक बनलेल्या याच एल्फिन्स्टन पुलावरून हा उन्नत मार्ग जातो. त्यामुळं हा पूल पाडून त्याठिकाणी डबल डेकर पूल बांधण्याची तयारी एमएमआरडीएनं केलीय. त्यासाठी आजपासून म्हणजे १५ एप्रिलपासून हा पूल बंद करण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सूचना आणि हरकती नोंदवल्यामुळं पूल बंद पाडण्याबाबतचा निर्णय चार ते पाच दिवस पुढं ढकलण्यात आला.